अचूक जन्मवेळ का महत्त्वाची? जन्मवेळ शुद्धीकरण
दवाखान्यातील घड्याळ काही मिनिटे पुढे-मागे असले तरी घटना महिनोंमहिने पुढे-मागे घडू शकतात. आयुष्यातील घटनांवरून जन्मवेळ गणितीय पद्धतीने सेकंदापर्यंत कशी शुद्ध केली जाते.
नमस्कार,
कुंडलीसाठी जन्मवेळ अगदी योग्य (उदा. तास, मिनिट, सेकंद) माहित असणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या तंतोतंत घटना वर्तविता येतात. आपला जन्म होतो तेव्हा दवाखान्यातील देखील घड्याळ पाच दहा मिनिटे पुढे मागे असू शकते. त्यामुळे जन्माचा दाखला काढताना नोंद करणारे बरेच जण अंदाजे जन्म वेळ लावतात. यातून आपल्या जीवनातील घडणाऱ्या घटना कधी कधी पाच पाच सहा महिने पुढे मागे घडू शकतात याचं कारण जन्मवेळ योग्य जवळपास 80 टक्के लोकांची नोंद नसते.
एक चांगली गोष्ट अशी की आपली जन्मवेळ गणितीय वैज्ञानिक पद्धतीने आता शुद्धीकरण करता येते. या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. एक आवश्यक घटक म्हणजे जातकाने त्याच्या वैयक्तिक जीवनामधील आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या घटना तारीख, महिना, आणि वर्ष या पद्धतीने नोंद करून आमच्याकडे द्यावे. त्यामध्ये चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारच्या किमान दहा ते पंधरा घटना नोंद करून व्हाट्सअपला वैयक्तिक आम्हाला पाठवाव्यात. यामध्ये महत्त्वाची परीक्षा पास होणे, प्रेम केव्हा लग्न, अपत्य, अपघात, आई- वडील- काका- आत्या, आजी- आजोबा- यांच्या जीवनातील काही घटना, आरोग्य संबंधित, वाद, सासू-सासरे यांच्या आरोग्य किंवा मृत्यू, मित्रपरिवार सामाजिक संबंधातून धोका, बहिण भावाच्या जीवनातील चांगल्या-वाईट घटना तसेच अन्य तुम्हाला जे आठवेल त्या महत्त्वाच्या घटना टाईप करून पाठवणे. दिवस माहित नसेल तरी काय हरकत नाही परंतु आठवडा, महिना आणि वर्ष हे आवश्यक आहेत.
भूतकाळातील ग्रह स्थितीनुसार आम्ही त्या घटना गणितीय पद्धतीने तपासून पाहतो आणि जन्मवेळ तंतोतंत अगदी सेकंद पर्यंत काढण्यास मदत होते. एकदा जन्म वेळ मिनिट सेकंद नुसार सिद्ध झाली तर आपल्याला पुढे जीवनातील घटनांचे प्रेडिक्शन करण्यासाठी प्रचंड फायदा होतो.
-प्रा. रोहित नाईक ज्योतिषशास्त्र संशोधक आणि मार्गदर्शक, संपर्क: 7517051515
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.