Research

ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथ आणि वस्तुनिष्ठता

ज्योतिषशास्त्रावरील पुस्तकं दिशा दाखवतात, पण वस्तुनिष्ठ भाकीत अनुभवातूनच सिद्ध होते: भारतीय-पाश्चात्य ग्रंथ, रॉबर्ट हँड आणि एका प्रत्यक्ष घटनेचा अनुभव.

Professor Roheit Naik · 5 July 2025 · 2 min read · मराठी
First Greek edition of Ptolemy's Tetrabiblos, Nuremberg 1535 · public domain, via Wikimedia Commons
First Greek edition of Ptolemy's Tetrabiblos, Nuremberg 1535 · public domain, via Wikimedia Commons

आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांच्या अनुभवातून सापडलेली एक गंमत सांगतो. प्रथम म्हणजे ज्योतिषशास्त्रावरील पुस्तकं ही प्रत्यक्षात तुम्हाला वस्तुनिष्ठ भाकीत सांगण्यासाठी अजिबात कधीच मदत करत नाहीत. हो आणि हे मी बऱ्याच भारतीय आणि पाश्चिमात्य पुस्तकांच्या अनुभवावरून बोलतोय. भारतीय क्लासिकल काही पुस्तकं सोडले तर आधुनिक युगातील बहुदा सगळेच भारतीय ज्योतिष लेखक हे भ्रमित आहेत. एम्स मधल्या बऱ्याच डॉक्टरांनी लिहिलेली मेडिकल ॲस्ट्रोलॉजी वरील पुस्तकं मी चाळली आणि त्यातील यत्किंचितही प्रत्यक्ष अनुभव मला आलेला नाही.

पंचमहाभूतांवरती जे सखोल चिंतन करतील त्यांना ज्योतिष शास्त्रातील गाभा कळालेला आहे असे समजले तर हरकत नाही. ही सगळी मूलभूत घटक आपल्याला पूर्णतः समजलेले आहेत असे मानून पुढे पाश्चिमात्य लेखक त्यांच्या ग्रंथात ग्रहांच्या अभ्यासाचे विश्लेषण करतात. परंतु कोणताच लेखक आणि ग्रंथ तुम्हाला ठाम अशा वस्तुनिष्ठ घटना घडण्याचे आश्वासन देत नाहीत. पुस्तक ही फक्त मार्गदर्शनासाठी असतात, दिशा दाखवण्यासाठी असतात. ज्योतिषशास्त्रीय अंदाज हे अनुभवातून सिद्ध करता येतात अन्यथा याला कोणताच शॉर्टकट आणि स्मार्टवर्कचा पर्याय नाही. रॉबर्ट हँड हा कित्येक मातब्बर ज्योतिषांमधील गणला जाणारा आधुनिक काळाचा ज्योतिषी आहे. त्याने लिहिलेले पुस्तक प्लॅनेट्स इन ट्रान्झिट मध्ये प्लुटो, हर्षल या हिंसक ग्रहांचे इतर ग्रहांच्या दृष्टीतील परिणाम मी वाचत होतो आणि बहुतांशी ते सगळे परिणाम मानसिक पार्श्वभूमीवरीलच त्याने चर्चिलेले आहेत. परंतु मानसिक परिणाम सोडल्यानंतर प्रत्यक्षात रोजच्या जीवनात त्याची काय प्रचिती येईल हे निश्चित कुठल्याच पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही.

एका कुंडली वरून बऱ्याचदा मी त्या जातकाच्या नातेवाईकांच्या बद्दल देखील आरोग्य, स्वभाव, प्राप्ती वर्तविले आहे. आणि ते तंतोतंत देखील लागू झालेलं आढळलं आहे. एक नाशिक मधील इसमाची कुंडली एक महिन्यापूर्वी पाहून मी सांगितलं होतं की त्याच्या मोठ्या मामांच्या मणक्याला किंवा मज्जातंतूवर आघात होण्याची शक्यता आहे. कृपया गाडी, वाहन हे पंधरा-वीस दिवसाच्या काळात पळवू नये. त्यांनी असे घरातल्या सर्वांना सांगितल्यानंतर मामांनी गाडी पळवायचे बंद देखील केले. परंतु 3 जून ते 15 जून या काळात सांगितलेला हा योग बरोबर तीन तारखेला चार वाजता दुपारी त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं की तुम्ही म्हटला होता तसं झालं मामांच्या कमरेमध्ये भटकणाऱ्या गाईने लाथ घातलेली आहे आणि कंबरेच्या खालील सगळा भाग त्यांचा काम करेना असा झालेला आहे. त्यांना कोमा मध्ये ठेवलेला आहे अमुक अमुक.. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की पुस्तकात कोणतेच भाकीत वस्तुनिष्ठ मिळत नाही हे ज्या त्या ज्योतिषाच्या अनुभवातून सिद्ध होत असतं.

-प्रा. रोहित नाईक ज्योतिषशास्त्र संशोधक

Follow the Astro.Roheit channel on WhatsAppNew articles, predictions and videos, straight to your phone.Follow
Questions about your own chart?

Professor Roheit Naik answers them in a private consultation.

For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.