रवी-प्लुटो युती: Identity Crisis and Rise in Suicidal Tendencies in Society
21 जानेवारी 2025 रोजी कुंभेत Altair ताऱ्यासोबत होणारी रवी-प्लुटो युती, वक्री मंगळ आणि नेपच्यूनचे स्थिर तारे: समाजातील वाढत्या हिंसक घटनांमागील ज्योतिषशास्त्रीय कारणांचे विवेचन.
नमस्कार हल्ली आत्महत्या, निर्घृण खून, किंवा हत्या होण्याचे प्रमाण समाजामध्ये प्रचंड वाढलं असल्याचं दिसतं. त्याच्या पाठीमागं ज्योतिष शास्त्रीय असणारी कारणे मी इथे विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे. क्रूरपणा तसेच आत्मक्लेष हे मंगळ, हर्षल, आणि प्लुटो या ग्रहांचे स्वभाव गुणधर्म आहेत. मंगळाकडे अहंभाव आहेच परंतु तो शक्ती आणि शारीरिक सामर्थ्यातून आलेला आहे. हर्षल बौद्धिक, वैज्ञानिक, तसेच तांत्रिक शक्तीमुळे अहंयुक्त आहे. प्लुटोकडे हट्टीपणा, ध्यास, मृत्यू आणि कारक. त्यामुळे तो निसर्गतः स्वमर्जीने चालणारा आहे.
ज्योतिषशास्त्रात, कुंभ (वायु) राशीमध्ये सूर्य- प्लूटो च्या सहयोगात असणे हे एक अतिशय तीव्र परिणामकारक असते.
सूर्य तुमची मूळ ओळख आणि जीवन शक्ती दर्शवतो, तर प्लूटो परिवर्तन आणि खोल शक्तीचे प्रतीक आहे. कुंभ या वायू राशीमध्ये, ही ऊर्जा यथास्थिती हलवून आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. स्वतःच्या ओळखीबद्दल मोठं परिवर्तन घडवून आणणार हे संयोजन आहे. तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या कारणांकडे आकर्षित होऊ शकता आणि जगात बदल घडवण्यासाठी तुमचा प्रभाव वापरण्यास भाग पाडू शकता. हे प्लेसमेंट तुम्हाला चुंबकीय आणि अगदी काहीशी मानसिक भीतीदायक परिस्थिती निर्माण करू शकते. कारण दोन्हीही ग्रह हे मूलगामी परिणामकारक आहेत. तुम्ही सतत प्रतिकाराविरुद्ध लढत आहात असे देखील वाटू शकते. कारण रवी हा प्रतिमेचा, तत्वांचा, प्रतिष्ठेचा कारक आहे.
रवी आणि प्लुटो कुंभ राशीत 1°43' कले वरती 21 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:58:39 वाजता युती घडून येईल ही युती 26 जानेवारी 2025 रात्री 7:48 पर्यंत असेल. ही युती Altair नावाच्या स्थिरताऱ्या सोबत होते आहे. प्लूटो मागील नोव्हेंबर पासूनच या तार्याच्या युतीत आहे. हा तारा मंगळ, बुध, हर्ष, गुरु या ग्रहांच्या गुणधर्माने युक्त आहे. आरोग्यावरती पाहिलं तर डोळे, ब्रेन (मायग्रेन) आणि मानसिक नैराश्य बनवतो. याच्याकडे मंगळ, हर्षल, आणि प्लुटो मधील हिंसकपणा, हुकूम गाजवणे, रक्तपात असे परिणाम देखील दिसून येतात.
अंशात्मक युती काळातील कुंडली वरून लग्नेश रवी प्लूटोच्या सहयोगातून अष्टमातील शुक्र आणि शनी वरती अर्ध काटकोन दृष्टीत असतील. चतुर्थ बिंदू जवळ तूळ मधील चंद्रावर नेपच्यून राहूची षडाष्टक दृष्टी दिसते जी चित्रपट अभिनय मीडिया मधील ज्येष्ठ तसेच महिलांचा मानसिक वय मनस्यातून मृत्यू किंवा खून घडण्याची शक्यता दर्शवितो. Vertex हा बिंदू ज्योतिष शास्त्रात नशिबाचा शिरोबिंदू म्हणून वापरला जातो. म्हणजे हा ज्या भावात किंवा ग्रहाच्या सोबत असेल त्याबाबतची घटना प्रकर्षाने विशिष्ट त्या काळात घडताना दिसते. हा बिंदू पंचमात धनु राशीतून पंचमेशावरतीच प्रतियोग दृष्टी दर्शवीत आहे आणि पंचमेश गुरु लाभात वक्री असून अष्टमातील शनि शुक्रावरती केंद्र दृष्टीत आहे जो पुन्हा मीडिया तंत्रज्ञान दळणवळण आणि शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रातील विघातक घटना घडण्याच्या शक्यता दर्शवीत आहे. हा झाला पुढील काळातील काही घटनांचा अंदाज.
पुन्हा आपण या विषयाकडे येऊ की मग या घृणास्पद घटना घडत आहेत तर Altair या स्थिरताऱ्याचं वैशिष्ट्य आणि परिणाम आपण पाहिलंच परंतु सध्या अग्निकारक मंगळ कर्क जलराशीत वक्री आहे जो उथळ, अतार्किक विचार करून कोणताही पाऊल उचलायला लावतो. मंगळ हा Pollux या कर्क राशीतील स्थिरताऱ्याच्या युतीत आहे. या तार्याचे वैशिष्ट्य हा धाडस, माथेफिरू, उद्दीपित, क्रूर कृत्य आणि विष संबंधित स्वभाव दर्शवितो. 23 जानेवारीला या मंगळाची अंशतः युती या ताऱ्याशी होईल आणि तेव्हा मंगळाची बुधावरती प्रतियोग दृष्टी असेल.
आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नेपच्यून हा ग्रह Markab या तार्याच्या युतीत 18 ऑक्टोबर 2024 पासून आहे. हा तारा गुरु आणि मंगळ स्वभावाचा आहे. समुद्र प्रवासी अपघात गुदमरून, घुसमटून मृत्यू योग असे या तार्याचे निगेटिव्ह परिणाम आहेत. परत एक दोन महिन्याच्या काळातच नेपच्यून Scheat या मंगळ बुध स्वभाव युक्त ताऱ्याच्या युतीत असेल जो खूप निगेटिव्ह आहे. याचे देखील परिणाम मानसिक डिप्रेशन, घरगुती वाद, अचानक अपघात तसेच पाण्यात बुडून किंवा घुसमटून मृत्यू असे योग दर्शवितो. नेपच्यून मीन राशीत या दोन ताऱ्यांच्या सोबत असताना फार विचित्र परिणाम जातकास किंवा समाजात पहावयास मिळतो जी सध्या गेल्या काही महिन्यापासून घटना घडत आहेत त्याला प्रामुख्याने हे दोन तारे आणि रवी प्लुटो ची युती Altair या ताऱ्यासोबत असल्याने दिसत आहे.
-प्रा. रोहित नाईक सायन ज्योतिषशास्त्र अभ्यासक, संपर्क 7517051515
मदत हवी असल्यास
तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला आत्महत्येचे विचार येत असतील, तर कृपया लगेच मदत घ्या. Tele-MANAS: 14416 (टोल-फ्री, 24 तास, भारत सरकार). तातडीच्या प्रसंगी 112 वर फोन करा.
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.