वाचन: माझी जीवनशैली
ॲलन लिओ यांच्या 'ॲस्ट्रोलॉजी फॉर ऑल' मधील विचारापासून सुरुवात: मामांच्या लायब्ररीतून लागलेली वाचनाची सवय, मानसशास्त्र-विज्ञानाचे वाचन आणि आईच्या आजारपणात घट्ट झालेली वाचनाची नाळ.
"ज्योतिषशास्त्राचा बचाव लिहिण्याचा दिवस निघून गेला आहे, आणि कितीही युक्तिवाद त्या संशयी व्यक्तीला कधीही पटवून देणार नाही, जो एकतर खूप विकृत आहे किंवा ज्योतिषशास्त्रासारख्या भव्य शास्त्राचा शोध घेण्यास खूप उदासीन आहे, एक शास्त्र जे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्याचे स्पष्टीकरण देते. सर्वोत्कृष्ट चाचणी जी यासाठी लागू केली जाऊ शकते, या ज्ञानाची योग्य प्रचिती तेव्हाच लोकांना येईल जसे की इतर ज्ञान सिद्ध करतात अनुभवांच्या आधारे..."
-ॲलन लिओ, ॲस्ट्रोलॉजी फॉर ऑल (परिचय, पान क्र. १)
माझे मोठे मामा इंग्रजी विषयाचे प्रिन्सिपल. त्यांच्या घरी मी आयुष्याच्या महत्त्वपूर्ण वळणावरती शिक्षणासाठी राहायला होतो. त्यांच्या घरी स्वतंत्र लायब्ररी आहे. संपूर्ण कॉलेजमध्ये मी इंग्रजी विषय स्पेशल ठेवून प्रथम यायचो. अर्थात ज्योतिषशास्त्राची आवड ही मला दहावीपासूनच होती. पालक सुज्ञ आणि जगाचे जाणकार असल्यामुळे त्यांनी मला ज्योतिषशास्त्र हा दुय्यम विषय आहे असे कधीच म्हटलेलं मला आठवत नाही. माझ्या अनुभवात आलेली गोष्ट सांगतो ज्याच्याकडे जगाकडे वेगळ्या अँगलने पाहण्याचा चष्मा नाही, विशेषतः जे स्वतःची प्रत्येक गोष्टीबद्दल छोटी-छोटी मत बनवून घेतात ते नवीन विचारांना एक्सेप्ट करायला तयार होत नाहीत. किंबहुना त्यांची तेवढी क्षमता नसते. सुदैवाने माझे पालक जगाचे जाणकार आहेत, सुविद्य आहेत त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहिलोय.
तर कॉलेजच्या काळात कथा कादंबऱ्या, नाटक, आणि इतिहासाबद्दल वाचण्याची ओढ मामांच्या मुळे लागली. मग माझ्याकडे एक विंडोजचा टॅब मी घेतला जिथे मी हस्तसामुद्रिकशास्त्र, मानसशास्त्र, अंकशास्त्र या विषयांवरती हजारो मोठमोठ्या संस्थेनी संशोधन केलेले लेख डाऊनलोड करून, काही रिसर्च जर्नलचे प्रीमियम मेंबरशिप घेऊन रिसर्च पेपर वाचत. मानसशास्त्र हा एक माझा सगळ्यात आवडता विषय. कारण मला वाटतं की प्रत्येक ज्योतिषाला पुढचा माणूस वाचता आला पाहिजे असं नाही, परंतु समोर येणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील काही मानसिक समस्यांवर लॉजिकल सोल्युशन देण्यासाठी मुळात कन्स्ट्रक्टिव्ह विचार करता आला पाहिजे, डिसिजन मेकिंग क्षमता हवी. मग त्यासाठी मी कॉग्निटिव्ह सायन्स, बिहेवियर सायन्स, न्यूरो सायन्स, आर्ट ऑफ निगोसिएशन, पब्लिक स्पिकिंग, लॉजिकल फॅलसीज आणि पॅरा इन्वेस्टिगेशन्स या विषयांबद्दल प्रचंड वाचलं.
माझ्या आईला मी नेहमी नव नवीन वाचतो हे पाहून खूप छान वाटायचं. मी अनेक ऑक्सफर्ड, कॅलिफोर्निया विद्यापीठात झालेले बिजनेस, मानसशास्त्रावरील संशोधनाची निष्कर्ष आईसोबत शेअर करत आणि ती देखील सर्व आवडीने ऐकत बसायची. ती एक आवडच जडली होती जणू मला. तिला किमो देण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये कित्येक तास बसायचो तेव्हा हॉस्पिटलच्या दारात एका गार्डनमध्ये मी माझा टॅब घेऊन तासन्तास वाचत बसत आणि घरी जाताना तिला तेव्हा चालू असलेल्या सगळ्या ट्रॉमामधून विचलित करायचो कारण तो अडीच वर्षाचा काळ आम्हा सगळ्यांनाच अनपेक्षित आणि असहाय्य फील होणारा होता. तिला निरनिराळ्या गोष्टी मी सांगत असताना तिला ते सर्व काही ऐकायला आवडायचं म्हणून देखील माझी वाचनाची नाळ घट्ट झाली.
मला वाटतं की माणूस तेव्हाच म्हातारा होतो जेव्हा तो नवीन शिकायचं थांबतो. शिकत राहणारा माणूस समोर येणाऱ्या प्रत्येक काळाला स्वतः अडॅप्ट करून घेतो आणि त्या काळाचा तो जिवंत साक्षीदार असतो. वाचन... मामाच्या संगतीत लागलेली ही फक्त एक सवय होती जी आता माझी जीवनशैली बनून गेली आहे. मी वाचताना खूप काही कष्ट घेतोय किंवा इतर बाकीच्या बऱ्याच गोष्टींचा त्याग करतोय असे अजिबात वाटत नाही. रादर मी खूप एक्साईट असतो नवीन वाचायला आणि वाचताना मी अध्यात्माच्या एका वेगळ्या फेजमध्ये जातो.
-प्रा. रोहित नाईक
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.