जागतिकीकरण
2024 च्या सुरुवातीला वर्तवलेले भाकीत: 2025 मध्ये अमेरिकेत 1930 सारख्या आर्थिक मंदीची शक्यता, भारतावर त्याचा मर्यादित परिणाम, जून 2025 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेला गती आणि सोन्याचे दर.
गेल्या वर्षी म्हणजेच वर्ष 2024 च्या सुरुवातीला मी असे प्रेडिक्ट केलं होतं की अमेरिकेमध्ये मोठी आर्थिक मंदी किंवा ग्रेट डिप्रेशन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नवीन वर्षाच्या क्वार्टर हाफ काळातच भेडसावेल. जसे की मार्च एप्रिल मध्ये. जानेवारीत इलेक्शन होऊन ट्रम्प यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष म्हणून झाली आणि त्यांनी असे कठोर पावले उचलले आहेत जसे की 1930 या काळात अष्टमातील प्लुटो धनस्थानाच्या प्रतियोगात होता आणि त्या काळात ग्रेट डिप्रेशन ची जणू लाटच पसरली जी देशाच्या वित्तीय आघातातून निर्माण झाली होती. पुन्हा 2025 या वर्षांमध्ये त्याच पद्धतीची एक फेज निर्माण अमेरिकेच्या ग्रह स्थितीनुसार पूर्वीच मी वर्तवली होती.
परंतु याचा फारसा परिणाम भारतावर होणार नाही कारण इनमीन दोन टक्के उत्पन्न आपला देश परकीय चलनावरती अवलंबून आहे. आता राहिला प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेचा. जून 2025 काळानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय आर्थिक व्यवस्थेची गती आपणास पहावयास भेटेल. त्यामुळे फिस्कल डेफिसिट परिणामी इतकी पहावयास नाही भेटणार रादर भारतीय अर्थव्यवस्था जून 2020 पासून जी कोलमडलेली आहे त्यापैकी बऱ्यांशी चांगली डौलदार पहावयास भेटेल. सोन्याच्या किमती मात्र कमी होण्याच्या शक्यता आहेत.
-प्रा. रोहित नाईक ज्योतिषशास्त्र संशोधक आणि अभ्यासक
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.