Astrology

नेपच्यून

'धुंदी' आणि 'तंद्री' यांचा ग्रह: जब हॅरी मेट सेजल, Flow सिद्धांत, नातेसंबंधांतील स्पंदने, पंचमातील आणि षष्ठातील नेपच्यून आणि जीवनाचा हेतू.

Professor Roheit Naik · 20 February 2025 · 4 min read · मराठी
Neptune, imaged by NASA's Voyager 2 in 1989 (colour-calibrated) · CC0, via Wikimedia Commons
Neptune, imaged by NASA's Voyager 2 in 1989 (colour-calibrated) · CC0, via Wikimedia Commons

नमस्कार ज्योतिष शास्त्रातील नेपच्यून या ग्रहावरती माझे मनोगत व्यक्त करत आहे. "धुंदी" ही त्या क्षणांची जादू आहे, जिथे वेळ आणि जग माणूस विसरतो. कधी कधी माणूस कोणत्या तरी कामात किंवा अन्य गोष्टींमध्ये हरवतो त्या धुंदीमध्ये स्वतःला सापडतो देखील.

बॉलीवूड मधला एक शाहरुख खानचा चित्रपट आहे "जब हॅरी मेट सेजल". जिथे एक मुलगा पंजाब मधील छोट्या गावातून आई-वडिलांच्या पश्चात त्याचं हक्काचं स्वतःचं असं कोणी नसतं त्यामुळे जगभर टूरिस्ट गाईड म्हणून नोकरी शोधायला जातो. का, तर तो जीवनातील मोकळीकता भरून काढण्याच्या शोधात असतो? आणि तिथेच सेजल नावाची एक मुलगी भारतातूनच परदेशात साखरपुड्याच्या सोहळ्याला गेलेली असते आणि तोच गाईड मुलगा तिला भेटतो. एका श्रीमंत कुटुंबातील सेजलला होणारा नवरा अगदी प्रतिष्ठेप्रमाणे मिळालेला असून तो तिच्यासाठी योग्य साथीदार असल्याचे खात्री नसते आणि निमित्त ठरतं फक्त एक साखरपुड्यातील सेजलची अंगठी हरवते आणि त्या शोधा शोधीत या दोघांच्या मधील वाढलेला संवाद. त्या संवादातून दोघांची एकमेकांशी स्पंदने जुळतात आणि प्रेम जडतं. नायकाला म्हणजेच त्या गाईड मुलग्याला वाटते की मी जे आतापर्यंत शोधत होतो कदाचित ते म्हणजे सेजल सारखी एखादी मुलगी तरी नसेल? कारण आई-वडिलांच्या पश्चात हक्काचं त्याचं स्वतःचं असं कोणी राहिलेलंच नसतं त्यामुळे. चित्रपटात असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण जी गोष्ट शोधत असतो कदाचित तीच गोष्ट आपल्या शोधात असते. कारण सेजल देखील अशाच व्यक्तीच्या शोधात असते. आपल्या नेहमीच्या जीवनात देखील हाच प्रत्यय येतो. बहुतांशी योग्य वेळ नसते ती भेटण्यासाठी. परंतु भेटल्यानंतर ती स्पंदने जोडून येण्यासाठी नेपच्यून सारखा ग्रह खूप महत्त्वाचा आहे.

लोक 40- 50 वर्ष सुखाचा संसार करतात आणि वर्ष, काळ, दशक इतके पटकन गेल्याचे भासते जणू की काल-परवाच आपण भेटलोत आणि इतक्यात मुलं मोठी झाली नातवंड देखील आलीत. याचं कारण म्हणजे दांपत्यामधील स्पंदन जुळून आले की हा अनुभव निश्चित. मला बऱ्याचदा नेपच्यून हा धुंदी किंवा तंद्री या दोन मराठी शब्दांना सब्स्टिट्यूट वाटतो. Flow म्हणून एक पुस्तक आहे Mihaly Csikszentmihalyi हंगेरियन अमेरिकन लेखकानी लिहिलेलं. जो त्याच्या सिद्धांतामध्ये सांगतो की सर्वात आव्हानात्मक आणि क्लिष्ट कार्य करण्यासाठी मनुष्याची एकाग्रता आणि सातत्य म्हणजेच काय एकूणच तंद्री लागणे खूप महत्त्वाचा आहे. ही तंद्री लागण्यासाठी नेपच्यून हा ग्रह मला जास्त महत्त्वाचा आहे असं वाटतं कारण हर्षलाकडे प्रॅक्टिकल किंवा बाह्य परिणाम असतो परंतु नेपच्यूनकडे अंतर्गत मानसिकतेवर परिणाम अवलंबून असतो. हर्षल हा गुरु, बुध च्या प्रभावाने तृप्त असल्यामुळे कुशल बुद्धिमत्ता आणि तर्क करण्याची क्षमता बाळगतो. परंतु नेपच्यून हा चंद्र, शुक्र यांच्या शक्तीने युक्त असल्यामुळे मानसिक स्थितीवर जास्त परिणाम करतो. पाश्चात्य लेखक नेपच्यूनला शुक्राचा अतिउच्च परिणामक बिंदू मानतात. दारू, चरस, गांजा, मौज- मस्ती हे नेपच्यून कडे शुक्राच्या प्रभावाने आलेले आहेत.

नेपच्यून हा अंतर्मनाचा कारक असल्यामुळे बहुतांशी हा षष्ठ स्थानात विराजमान असताना लोकांना सिक्स सेन्स स्ट्रॉंग देतो आणि टेलिपॅथी सारखे जातकांना अनुभूती खूपदा देतो. आता नेपच्यूनची दृष्टी ही कोणत्या ग्रहावर आहे हे पुढील व्यक्तींच्या नातेसंबंधांसाठी आणि व्यक्तिगत जीवनामध्ये माणसाचा हेतू शोधण्यासाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. पंचमातील नेपच्यून हा प्रेम संबंधांमध्ये आपल्याला गोंधळात पाडतो कारण पंचम स्थान हे आकर्षणाचे, विद्येचे, उच्च शिक्षणाचे आणि परिणामतः कॉलेज जीवनातील काळात विजोड व्यक्तीच्या सोबत आंधळेपणाने (कारण, नेपच्यूनकडे बुद्धी पेक्षा धुंदी असते) प्रेमात पडणे आणि नेपच्यून स्वभावतः स्थिर नसल्यामुळे काही कालावधीनंतर त्या प्रेमामध्ये अपयश देखील देण्याची शक्यता असते. बऱ्याचदा मी लोकांच्या सिनास्ट्री (निरायण गुण-मिलन) पाहतो तेव्हा वर सांगितलेल्या दाम्पत्यांच्या 30 40 वर्षाच्या आनंदी संसारातील गमक लग्न, चंद्र, रवी, शुक्र, गुरु या सिग्निफिकेटर्स सोबत मी नेपच्यून देखील बारकाईने पाहिला तर तो या सिग्निफिकेटर्स पैकी एक किंवा दोन ग्रहांच्या वरती शुभ योगात असल्याचे मला आढळले आहे.

चंद्र आणि नेपच्यून यांचा अंशात्मक शुभ योग बऱ्याचदा व्यक्तीला सर्जनशील आणि निर्मितीकार बनवतो परंतु नेपच्यूनची धुंदी चंद्राशी योग्य दृष्टीत लागल्यामुळे त्या जातकांना करिअरमध्ये नेमकं बऱ्याचदा काय करायचं हा प्रश्न मात्र सतत भेडसावत असल्याचे दिसतो. मग मला वाटते की या लोकांनी फ्रीलान्सिंग, एक्टिंग आणि बोलण्याच्या (बुध स्वराशीत विशेषतः वायुराशीत असेल तर) बाबतीत खूप चमक देऊ शकेल. नेपच्यून आकाश तत्वाच्या राशीचा स्वामी असल्यामुळे आकाशीय (ज्ञान, पराविद्या, साक्षात्कार) यांच्यात मूलतः विपुल असते. स्पेसमध्ये ज्ञान (इंटरनेट) पसरलेले असते फक्त त्या ज्ञानाशी भिडणे (बुध, गुरु, हर्ष यांच्या शुभ दृष्ट्या) म्हणजेच तुमच्या नेपच्यूनच्या दृष्ट्या आणि स्थान (कोणत्याही राशीमध्ये) उत्तम असते. आता तुम्ही म्हणाल की कोणत्याही स्थानात तर मग योग्य स्थान असे मी का म्हणत आहे? तरी याचे उत्तर असं की आपल्या प्रत्येकाचा जीवनाचा हेतू वेगळा असतो. समजा कोणी भक्तिमार्गात मोलाचे योगदान करण्यासाठी जन्मतो, तर कोणी शिक्षण क्षेत्रात, कोणी राजकारणात तर कोणी क्रीडा क्षेत्रात. ज्या त्या भावाचे वैशिष्ट्य घेऊन जो तो व्यक्ती त्याचे कर्म कार्य करत असतो फक्त त्या भावातील ग्रहांच्या वरती असणाऱ्या नेपच्यून, केतू आणि शनि यांसारखे कार्मिक ग्रह कोणत्या दृष्ट्या दर्शवितात यानुसार मनुष्याला उपलब्धि मिळत असते. मन लागत नाही असे लोक बऱ्याचदा तक्रार करत असतात तेव्हा मला वाटतं की त्यांचं मन-तंद्री जिथे कोणत्या क्षेत्रात ठिकाणी हे सिग्निफिकेटर्स शोधून ग्रहांचे मर्म शोधून योग्य ते मार्गदर्शन जातकांना करता येते.

-प्रा. रोहित नाईक सायन ज्योतिष संशोधक आणि अभ्यासक, संपर्क ७५१७०५१५१५

Follow the Astro.Roheit channel on WhatsAppNew articles, predictions and videos, straight to your phone.Follow
Questions about your own chart?

Professor Roheit Naik answers them in a private consultation.

For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.