शास्त्रीय संगीताचा नवा काळ
पंडित रविशंकर यांच्या पत्रिकेतील योग, एका विद्यार्थिनीच्या पत्रिकेतील साम्य आणि 20 नोव्हेंबर 2024 पासून प्लुटो कुंभेत गेल्यावर शास्त्रीय संगीताकडे जगभर वाढणारी ओढ.
पंडित श्री रविशंकर (1920-2012) भारतीय शास्त्रीय संगीतात महान योगदान देणारे. सितार वादन, गायन अशा अनेक कौशल्याने निपुण. त्यांच्या पत्रिकेत खूप काही चांगल्या गोष्टी उपजत होत्या. देश विदेशातील यश, सन्मान, पुरस्कार, कीर्ती मला त्यांची आठवण माझ्या एका मुलीची (विद्यार्थिनीची) पत्रिका पाहिल्यानंतर सार्थ होते.
2004 चा जन्म आणि या मुलीच्या देखील पत्रिकेत पंडितजींच्या सारखे जवळपास 80/90 टक्के योग आहेत. योगायोग म्हणावा किंवा प्रारब्ध तिला देखील पूर्वीपासूनच गायनाची आणि सितार वादनाची(च) प्रचंड आवड आहे. संगीताची आवड, संगीत वाद्यावरील तिची हातोटी पाहून मला पंडितजींची उपलब्धि, देश-विदेशातील यश, सन्मान, कीर्तीचीच जाणीव होते.
प्लेटो ग्रह हा जागतिक मोठी स्थित्यंतर घडवतो. 1775 ते 1800 या काळात कुंभ राशि मध्ये असताना शास्त्री संगीताची एक वेगळी ओळख जगभर प्रचलित निर्माण झाली होती. कन्या आणि कुंभ राशि ह्या साहित्य, कला, संगीत याच्याकडे ओढ दाखवणाऱ्या असतात. 1956 काळात पुढची दोन दशक प्लेटो जेव्हा कन्या राशीत होता तेव्हा पंडित श्री रविशंकर यांचे शास्त्रीय संगीत जगभर पोहोचलं. पंडितजींच्या मुळे संतूर वादनाची नवी ओळख सातसमुद्रा पार प्रचलित झाली. आता पुढील दोन ते अडीच दशक प्लेटो पुन्हा कुंभेत 20 नोव्हेंबर 2024 ला जाणार आहे. याचाच अर्थ शास्त्रीय संगीताकडे पुन्हा वेगळी ओढ आणि ट्रेंड जगभर निर्माण होईल. संगीत क्षेत्राकडे वळणाऱ्या लोकांना भविष्य खूप चांगला आहे. क्लासिकल संगीताकडे मुलांना ओढ आपोआपच निर्माण होईल.
-प्रा. रोहित नाईक
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.