Astrology

तुम्ही Bracelet किंवा Ring सुचवता का?

मूलांक किंवा राशीवरून Amethyst, Money Attraction Bracelet, पाचू, Red Coral सुचवणे योग्य का नाही; आणि पार्वतीच्या महालाची कथा: नशिबात योग आला की मिळते.

Professor Roheit Naik · 10 August 2026 · 2 min read · मराठी
Shiva and Parvati, chromolithograph attributed to Raja Ravi Varma · Public domain, via Wikimedia Commons
Shiva and Parvati, chromolithograph attributed to Raja Ravi Varma · Public domain, via Wikimedia Commons

प्रश्न: तुम्ही Bracelet किंवा Ring सुचवता का? उदाहरणार्थ, मूलांक ८ साठी Amethyst Bracelet किंवा Money Attraction Bracelet असतं, किंवा राशीनुसार पाचू, Red Coral वगैरे?

उत्तर: माझ्या मते, केवळ मूलांक, राशी किंवा एखाद्या ग्रहाच्या नावावरून Bracelet किंवा Ring सुचवणे योग्य नाही.

Amethyst घातलं म्हणून पैसा आकर्षित होईल, Money Attraction Bracelet मुळे आर्थिक परिस्थिती बदलेल, किंवा राशीनुसार पाचू अथवा Red Coral घातल्याने आयुष्य बदलून जाईल असा सरसकट नियम मी मानत नाही.

माझ्यासाठी कुंडलीतील ग्रहस्थिती ही अधिक महत्त्वाची आहे.

शांती, पूजा, उपवास वगैरे केल्याने काहीच होत नाही, असेही नाही; पण त्यांचा अर्थ ग्रहांच्या कर्मफलाला मनमानी पद्धतीने बदलणे असा नाही. देव हा श्रद्धेचा धनी आहे; भक्ताकडून त्याला इतर कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसते. शेवटी आपल्या आयुष्यात काय मिळणार, काय गमावणार आणि कोणत्या गोष्टी कधी घडणार यामागे आपल्या कर्माचा आणि कुंडलीतील ग्रहयोगांचा मोठा संबंध असतो.

पार्वतीच्या महालाची कथा

यासाठी एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा माता पार्वतीने भगवान महादेवांकडे आग्रह केला की, "आपल्याला कायमस्वरूपी राहण्यासाठी एक सुंदर घर असावे."

महादेव मिश्कीलपणे म्हणाले, "जेव्हा तुझ्या नशिबात घराचा योग येईल, तेव्हा घर मिळेल. अजून तुझ्या नशिबात तो योग आलेला नाही." पण माता पार्वती म्हणजे हट्ट सोडणाऱ्या नव्हेत; त्यांनी आग्रह धरला, "नाही! मला घर हवं म्हणजे हवं. आणि ते आत्ताच हवं!"

मातेचा हट्ट पाहून भगवान महादेवांनी एक सुंदर, भव्य आणि आलिशान महाल उभा केला. महाल इतका अप्रतिम होता की, तो पाहून माता पार्वतींचे डोळे आनंदाने भरून आले.

मग त्यांनी महालाच्या वास्तुपूजेसाठी रावणाला पुरोहित म्हणून बोलावण्याची इच्छा व्यक्त केली. रावणाने यथासांग वास्तुपूजा आणि इतर सर्व विधी पूर्ण केले. शेवटी दक्षिणा देण्याची वेळ आली. महादेव आणि माता पार्वती प्रसन्न मनाने रावणाला म्हणाले, "आपल्याला दक्षिणेत काय हवे आहे, ते मागावे." आणि रावणाने जे मागितले, ते ऐकून दोघांनाही धक्का बसला: त्याने दक्षिणा म्हणून तो संपूर्ण सुंदर महालच मागून घेतला!

पुरोहिताला दक्षिणा देण्याची प्रथा आणि दिलेले वचन मोडणे शक्य नव्हते आणि त्यामुळे माता पार्वतींना स्वतःच्या डोळ्यांसमोर तो महाल रावणाला द्यावा लागला.

या कथेतला संदेश अत्यंत सुंदर आहे: "नशिबात जेव्हा एखादी गोष्ट मिळण्याचा योग असतो, तेव्हाच ती मिळते. नशिबाच्या आधीही नाही आणि नशिबानंतरही नाही."

जय महाकाल! 🔱

-प्रा. रोहित नाईक इंग्रजी साहित्य, ज्योतिषशास्त्र अभ्यासक

Found this useful? Share it:
Follow the Astro.Roheit channel on WhatsAppNew articles, predictions and videos, straight to your phone.Follow
Questions about your own chart?

Professor Roheit Naik answers them in a private consultation.

For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.

Read next

Virat Kohli at the Prime Minister's Office, New Delhi · Photo: Prime Minister's Office (GODL-India), via Wikimedia Commons
Astrologyಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

सर्व काही पूर्वीच लिहून ठेवलंय, तर ते कसं बदलणार?

विधिलिखित आणि आपली निवड: काय बदलता येत नाही, काय आपल्या नियंत्रणात असतं, आणि योग्य वेळ, ठिकाण, संगत आणि कृती ज्योतिषशास्त्र कसे दाखवते.

#Questions and answers#Destiny#Free will#Famous charts
5 September 2025 · 3 min read
Savitri pleading with Yama for her husband Satyavan · Chromolithograph, Wellcome Collection, CC BY 4.0, via Wikimedia Commons
Astrologyಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

उपवास: श्रद्धेसाठी, प्रयत्नांच्या जागी नाही

वटसावित्री, हरतालिका यांसारखे उपवास या सांस्कृतिक प्रथा; संस्कृती फक्त स्त्रियांनीच का जपावी, आणि परीक्षेच्या यशासाठी अभ्यास, सातत्य आणि योग्य वेळेचे नियोजन.

#Questions and answers#Fasting#Culture#Exams
14 September 2026
Sir Isaac Newton, portrait by Godfrey Kneller (1689) · Public domain, via Wikimedia Commons
Astrologyಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

आयुष्यात लोक महत्त्वाचे की पैसा?

प्राधान्यक्रम, तुलना आणि समाधान विरुद्ध आनंद: न्यूटनने कॅल्क्युलस कसा विकसित केला, आणि पैसा व माणसं ही कामाची उप-उत्पादने का असतात.

#Questions and answers#Life#Priorities#Happiness
12 October 2025 · 3 min read