उपवास: श्रद्धेसाठी, प्रयत्नांच्या जागी नाही
वटसावित्री, हरतालिका यांसारखे उपवास या सांस्कृतिक प्रथा; संस्कृती फक्त स्त्रियांनीच का जपावी, आणि परीक्षेच्या यशासाठी अभ्यास, सातत्य आणि योग्य वेळेचे नियोजन.
प्रश्न: Really, मग हे स्त्रियांसाठी उपवास कशासाठी आणि कोणी सुरू केलेत? म्हणजे वटसावित्री, हरतालिका इत्यादी. कारण मीही माझी exam qualify व्हावी म्हणून खूप उपवास केलेत. पण तुमच्याशी discussion केल्यामुळे आता असं वाटतंय की मी उपवास करण्यापेक्षा study वर जास्त भर द्यायला हवा?
उत्तर: या सर्व प्रामुख्याने सांस्कृतिक प्रथा आहेत. पण एक प्रश्न इथे नक्कीच विचारायला हवा: संस्कृती फक्त स्त्रियांनीच का जपावी?
संस्कृती देवाने निर्माण केलेली नसते; ती माणसाने निर्माण केलेली असते. आणि माणसाने निर्माण केलेल्या प्रत्येक व्यवस्थेमागे त्या काळातील सामाजिक विचार, गरजा आणि कधी-कधी पक्षपाती दृष्टिकोनही असतो. त्यामुळे प्रत्येक प्रथा केवळ श्रद्धेच्या आधारावर स्वीकारण्यापेक्षा तिच्यामागचा विचार समजून घेणे महत्त्वाचे आहे.
परीक्षेतील यश, नोकरी मिळणे, विवाह जुळणे, स्वतःचे घर बांधणे किंवा आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना, या सगळ्यांबाबत आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक संकेत ग्रहस्थितीच्या अभ्यासातून मिळू शकतात. म्हणूनच ज्योतिषशास्त्र हे माझ्यासाठी केवळ भविष्य सांगण्याचे माध्यम नसून, योग्य वेळी योग्य दिशेने प्रयत्न करण्यासाठीचे एक प्रभावी मार्गदर्शक आहे.
म्हणून माझा साधा विचार आहे: उपवास करायचा असेल तर श्रद्धेसाठी करा; पण यशासाठी केलेल्या प्रयत्नांची जागा उपवासाने घेऊ देऊ नका. Exam qualify करण्यासाठी तुमचा अभ्यास, सातत्य, योग्य strategy आणि योग्य वेळेचे नियोजन हेच तुमचे मुख्य साधन असले पाहिजे.
धर्मगुरू, उद्योजक आणि राजकीय लोक अनेकदा माणसाच्या मनात कोणती ना कोणती भीती किंवा अवलंबित्व जिवंत ठेवतात. कारण माणूस स्वतंत्रपणे विचार करू लागला की तो प्रश्न विचारतो, स्वतः निर्णय घेतो आणि कोणत्याही बंधनाला सहज स्वीकारत नाही.
म्हणूनच मी महाकालला मनोमन प्रचंड मानतो. पण त्याच्याशी संवाद साधण्यासाठी माझ्या आणि त्याच्यामध्ये कोणीतरी मध्यस्थ असण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
श्रद्धा असावी; पण विवेक गहाण ठेवून नाही. प्रार्थना असावी; पण प्रयत्नांच्या जागी नाही. 🕉️🍃💫
-प्रा. रोहित नाईक इंग्रजी साहित्य, ज्योतिषशास्त्र अभ्यासक
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.