मुहूर्तशास्त्र: Sahl bin Bishr काय सांगतो?
प्राचीन पर्शियन विद्वान Sahl bin Bishr यांच्या ग्रंथातून: मुहूर्त फक्त 'टायमिंग' आहे, नशिबाचा पाया जन्मकुंडलीत असतो; कॅलेंडरमधील सामायिक मुहूर्त का चुकीचे.
एक खूप प्राचीन Sahl bin Bishr या विद्वानाचा पर्शियन ग्रंथ नुकताच वाचत होतो, त्यात सापडलेला संदर्भ.
सध्या जसे लोक ज्योतिषशास्त्र किंवा मुहूर्तशास्त्रावर संशयाने पाहतात, त्याच पद्धतीने प्राचीन काळातील पर्शियन, ग्रीक लोक देखील एकमताने म्हणायचे की:
(1) मुहूर्तशास्त्र फार काही प्रभावी नसते.
(2) फक्त राजे, उच्च दर्जाचे लोक किंवा अत्यंत प्रभावशाली लोकांसाठी मुहूर्त अत्यंत फलदायक ठरतो.
याचे कारण असे की त्यांची जन्मकुंडलीच इतकी मजबूत असते की मुहूर्तातील कमकुवत ग्रह देखील त्यांच्या नशिबाबरोबर एकत्र काम करून चांगला परिणाम देतात.
मजबूत कुंडली + साधा मुहूर्त = चांगला परिणाम (असं एकूणच त्याने सूत्र मांडलं होतं).
Sahl सांगतो: सामान्य लोक, व्यापारी किंवा ज्यांची सामाजिक स्थिती खालची आहे त्यांच्यासाठी फक्त ग्रहस्थिती पाहून मुहूर्त देऊ नये.
मुहूर्त देताना खालील आवश्यक आहे
√ त्यांची जन्मकुंडली
√ त्यांच्या वर्षफळातील ग्रहांच्या हालचाली (revolutions)
√ त्यांच्या मुलांची जन्मकुंडली
कारण: मुहूर्त हा फक्त "टायमिंग" आहे; नशिबाचा पाया जन्मकुंडलीत असतो. आणि हे खरंच शास्त्रोक्त आहे. कारण आपल्याकडे फक्त कॉमनमध्ये एकच मुहूर्त सगळ्यांना सांगितला जातो. विशेषतः कॅलेंडरमध्ये दिलेले मुहूर्त ढोबळ मानाने सर्वजणच फॉलो करतात. खूप चुकीची गोष्ट आहे ही.
-प्रा. रोहित नाईक
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.