Astrology

ग्रहणं आणि अवतार (चित्रपट)

जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार' मालिकेतील सूर्यग्रहणांची प्रतीकं: अंत आणि नवी सुरुवात, सूर्य-चंद्र युतीनंतर जन्मणारा नवा काळ आणि निसर्गाची अमोघ शक्ती.

Professor Roheit Naik · 5 January 2026 · 1 min read · मराठी
Total solar eclipse, 11 August 1999 · Photo: Luc Viatour, CC BY-SA 3.0, via Wikimedia Commons
Total solar eclipse, 11 August 1999 · Photo: Luc Viatour, CC BY-SA 3.0, via Wikimedia Commons

मी नुकताच 'अवतार' चित्रपट पाहिला. मला विज्ञान-काल्पनिक (Sci-Fi) चित्रपट आवडतात, पण त्यांतही 'अवतार' विशेष आवडण्याचे कारण म्हणजे त्यातील सांस्कृतिक (Ethnic) आणि खगोलशास्त्रीय (Astronomical) प्रतीकांचा प्रभावी वापर. यातील एक प्रामुख्याने जाणवणारे प्रतीक म्हणजे "ग्रहणांचे" महत्त्व. ज्याप्रमाणे आपल्या सूर्यमालेत 'गुरु' हा बलाढ्य ग्रह आहे, त्याचप्रमाणे या विश्वातील एका आकाशगंगेत 'पॉलीफेमस' (Polyphemus) हा विषारी वायूंचा महाकाय ग्रह आहे, ज्याचा 'पँडोरा' हा एक महत्त्वाचा चंद्र आहे.

जेम्स कॅमेरूनने या चित्रपटाच्या तिन्ही भागांत चंद्र आणि सूर्यग्रहणांचे दर्शन घडवले आहे. पर्शियन, इजिप्शियन आणि ग्रीक प्राचीन ग्रंथांनुसार सूर्य हा सृष्टीचा निर्माता, आत्म्याचे प्रतीक आणि तेज, शौर्य व चैतन्याचे उगमस्थान मानला जातो. याच प्रतीकांचा वापर चित्रपटातील कथानकात खुबीने केला आहे. दुसऱ्या भागात, जॅकचा मुलगा नेतेयाम नेमक्या सूर्यग्रहणाच्या काळातच समुद्रातील लढाईत प्राण सोडतो. तिसऱ्या भागातही, आध्यात्मिक 'मेटकायना' जमातीची रोनाल एका मुलीला सूर्यग्रहणाच्या वेळीच जन्म देते. ही प्रसूती अत्यंत वेदनादायक आणि धोकादायक दाखवली असली, तरी मुलगी सुखरूप राहते आणि आई त्या वेदनेतून मुक्त होते.

याचा अर्थ असा की, ग्रहण हे केवळ अंधाराचे प्रतीक नाही, तर ते चांगल्या-वाईट गोष्टींच्या अंताचे आणि नवीन सुरुवातीचे सूचक आहे. अंधारानंतर उजेड येतोच, हे समीकरण निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच नेतेयामचा मृत्यू ग्रहणाच्या वेळी होतो, पण ग्रहणापाठोपाठ त्यांचा विजयही निश्चित होतो.

सूर्य आणि चंद्राच्या युतीनंतर एका नवीन काळाचा जन्म होतो, ज्याचे गणित प्राचीन ग्रंथांत मिनिटा-सेकंदांच्या अचूकतेने मांडलेले आहे. नैसर्गिक बदल संथ असले तरी ते अटळ असतात. पँडोरावरील युद्धाची सुरुवात ग्रहणापूर्वी होते आणि जॅकचा विजय झाल्यावर त्याचा शेवट होतो. ग्रहणाच्या प्रभावामुळे समुद्रातील नैसर्गिक शक्ती जागृत होतात आणि निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या "आकाशवासी" (मानवी) शत्रूंचा नायनाट करतात. निसर्गाच्या या गूढ आणि अमोघ शक्तीचे दर्शन 'अवतार'च्या प्रत्येक भागात प्रकर्षाने घडते. क्रमशः...

-प्रा. रोहित नाईक

Found this useful? Share it:
Follow the Astro.Roheit channel on WhatsAppNew articles, predictions and videos, straight to your phone.Follow
Questions about your own chart?

Professor Roheit Naik answers them in a private consultation.

For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.

Read next

The Sun in white light · Photo: Matúš Motlo, CC BY-SA 4.0, via Wikimedia Commons
Predictive techniquesಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

रवी-प्लुटो युती: Identity Crisis and Rise in Suicidal Tendencies in Society

21 जानेवारी 2025 रोजी कुंभेत Altair ताऱ्यासोबत होणारी रवी-प्लुटो युती, वक्री मंगळ आणि नेपच्यूनचे स्थिर तारे: समाजातील वाढत्या हिंसक घटनांमागील ज्योतिषशास्त्रीय कारणांचे विवेचन.

#Sun#Pluto#Conjunction#Fixed stars
18 January 2025 · 3 min read
Savitri pleading with Yama for her husband Satyavan · Chromolithograph, Wellcome Collection, CC BY 4.0, via Wikimedia Commons
Astrologyಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

उपवास: श्रद्धेसाठी, प्रयत्नांच्या जागी नाही

वटसावित्री, हरतालिका यांसारखे उपवास या सांस्कृतिक प्रथा; संस्कृती फक्त स्त्रियांनीच का जपावी, आणि परीक्षेच्या यशासाठी अभ्यास, सातत्य आणि योग्य वेळेचे नियोजन.

#Questions and answers#Fasting#Culture#Exams
14 September 2026
Shiva and Parvati, chromolithograph attributed to Raja Ravi Varma · Public domain, via Wikimedia Commons
Astrologyಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

तुम्ही Bracelet किंवा Ring सुचवता का?

मूलांक किंवा राशीवरून Amethyst, Money Attraction Bracelet, पाचू, Red Coral सुचवणे योग्य का नाही; आणि पार्वतीच्या महालाची कथा: नशिबात योग आला की मिळते.

#Questions and answers#Gemstones#Remedies#Destiny
10 August 2026 · 2 min read