Astrology

मनुष्याचे कर्म आणि मृत्यू यांचा काही संबंध असतो का?

पूर्वसंचित कर्म, व्यवहारातील कर्म आणि मृत्यू: वैद्यकीय ज्योतिषशास्त्र आजार टाळायला कशी मदत करते आणि 'पूर्वजन्माचे कर्म' ही गल्लत का आहे.

Professor Roheit Naik · 1 June 2025 · 2 min read · मराठी
Yama holding the Bhavacakra, the Wheel of Life · Gouache, Wellcome Collection, CC BY 4.0, via Wikimedia Commons
Yama holding the Bhavacakra, the Wheel of Life · Gouache, Wellcome Collection, CC BY 4.0, via Wikimedia Commons

प्रश्न: मनुष्याचे कर्म आणि मृत्यू यांचा काही संबंध असतो का?

उत्तर: खूप छान प्रश्न.

कर्म आणि मृत्यू यांचा तसा काही संबंध नाही. इथे कर्म हे पूर्वसंचित, आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी बोलतोय. बऱ्याचदा प्रचंड कारस्थानी आणि कुटील बुद्धीने चालणारे लोक आनंदी असल्याचे दिसेल. त्याचं कारण मनुष्याच्या जन्मकुंडलीत ठळकपणे दिसतं, एकदम परफेक्ट. मग आत्ता जसं वाईट स्वभावाची मनोवृत्ती समजते तसेच चांगल्या स्वभावाची लोक देखील तितक्याच तंतोतंत कळून येतात. चांगल्या स्वभावाची किंवा कर्म करणारी लोक बहुदा पुढील आयुष्यात म्हणावं तितकं सुखी जीवन जगलेलं पाहायला मिळत नाही. याचं कारण शोधण्यासाठी मी ज्योतिषशास्त्रात बरंच संशोधन केलं. चांगल्या लोकांना उतार वयात चांगले आजार देखील जडतात आणि त्यामुळे उतारवयात त्यांची सेवा करायला पुढच्या पिढीला होत नाही. मुलांवर चांगले संस्कार घडले असतील तर ते बघतात परंतु हा देखील भाग कर्मावरती अवलंबून नसतो तर व्यक्तीच्या वैयक्तिक जन्मकुंडलीत हे स्पष्ट कळून येतं.

आता कर्म हे दुसऱ्या अंगाने समजूया. वैद्यकीय ज्योतिषशास्त्र म्हणून एक शाखा आहे. जिथे मनुष्याला भविष्यात उद्भवणाऱ्या व्याधी, आजार, तसेच समोर येणारे वाईट प्रसंग समजतात. जर हे आपल्याला पूर्वीच कळत असेल तर मनुष्याचे कर्म म्हणजेच त्याची कृती, तो कोणती भूमिका घेतो यावरती त्या व्याधी, आजारांना स्वतःपासून कित्येक मैल अंतरावरती ठेवू शकतो. हे अनेक लोकांच्या आणि स्वतःला आलेल्या अनुभवातून बोलतोय.

एका अनोळखी व्यक्तीला जाता जाता तुम्हाला शक्य होईल ती मदत करून तुम्ही तुमच्या वाटेला लागता आणि तोच व्यक्ती अचानकपणे तुमचं प्रचंड मोठं काम होणार असतं त्या ठिकाणी भेटतो आणि त्याच्याकडून तुमचं काम सहजपणे होऊन जातं. हे कर्म, ज्याला व्यवहारिक कर्म किंवा जगण्यातील मूल्ये म्हणतो, हे खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यांचे प्रत्यक्षात आपल्याला अनुभव येतात. परंतु पूर्वीच्या जन्मात केलेल्या एखाद्या कर्मामुळे तुम्हाला या जन्मात काही गोष्टी पहावयास, अनुभवास मिळतात हे सांगणारे लोक मुळात तुमच्याशी गल्लत करत असतात. हे पूर्णतः झूठ आहे.

समोर येणाऱ्या व्यक्तीला, वेळेला आणि प्रसंगाला आपण आपल्याला शक्य होईल तितक्या व्यवहारिक मूल्यांना धरून वागलो तर त्या कर्माची फळे आपल्याला रोजच्या जीवनात आज ना उद्या मिळतात. परंतु पूर्वसंचिताने आलेलं कर्म आणि आपलं प्रारब्ध किंवा मृत्यू यांचा तसा काही संबंध नसतो.

ज्योतिषशास्त्रात मृत्यूचे स्वरूप समजतं, कालनिर्णय देखील करता येतो. परंतु जन्म आणि मृत्यू हे दोन नियतीच्या हातात असतात त्यामुळे शक्यतो या संबंधित मनोमनी मला समजत असलं तरी लोकांना सांगणं मी तरी टाळतो...

-प्रा. रोहित नाईक

Found this useful? Share it:
Follow the Astro.Roheit channel on WhatsAppNew articles, predictions and videos, straight to your phone.Follow
Questions about your own chart?

Professor Roheit Naik answers them in a private consultation.

For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.

Read next

J. P. Morgan, 1902 · Library of Congress, public domain, via Wikimedia Commons
Astrologyಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

प्रत्येकाने कुंडली पाहणं आवश्यक आहे का?

प्रश्नोत्तर: कुंडली पाहणं बंधनकारक नाही, पण येणाऱ्या अडचणींसाठी आधीच तयार राहता येतं. वैद्यकीय ज्योतिष, पूर्वनियोजन आणि श्रद्धा-अंधश्रद्धा यांवर प्रा. रोहित नाईक.

#Questions and answers#Medical astrology#Planning
20 March 2025 · 2 min read
Savitri pleading with Yama for her husband Satyavan · Chromolithograph, Wellcome Collection, CC BY 4.0, via Wikimedia Commons
Astrologyಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

उपवास: श्रद्धेसाठी, प्रयत्नांच्या जागी नाही

वटसावित्री, हरतालिका यांसारखे उपवास या सांस्कृतिक प्रथा; संस्कृती फक्त स्त्रियांनीच का जपावी, आणि परीक्षेच्या यशासाठी अभ्यास, सातत्य आणि योग्य वेळेचे नियोजन.

#Questions and answers#Fasting#Culture#Exams
14 September 2026
Shiva and Parvati, chromolithograph attributed to Raja Ravi Varma · Public domain, via Wikimedia Commons
Astrologyಕನ್ನಡ · हिन्दी · English · मराठी

तुम्ही Bracelet किंवा Ring सुचवता का?

मूलांक किंवा राशीवरून Amethyst, Money Attraction Bracelet, पाचू, Red Coral सुचवणे योग्य का नाही; आणि पार्वतीच्या महालाची कथा: नशिबात योग आला की मिळते.

#Questions and answers#Gemstones#Remedies#Destiny
10 August 2026 · 2 min read