अनिश्चितता (Randomness), AI आणि ज्योतिषशास्त्र
Fooled by Randomness वरून: आपला मेंदू पॅटर्न शोधतो, पण खरे ज्ञान अनिश्चिततेत दडलेले असते; म्हणूनच AI ज्योतिषशास्त्राला पर्याय ठरू शकणार नाही.
भौतिकशास्त्राच्या एका विद्यार्थ्याने एक व्हिडिओ मला पाठवला आणि तो समजून सांगण्यासाठी विनंती केली. त्यापैकीच हे खालील विश्लेषण. कोरोनाच्या काळात एक पुस्तक वाचनातून गेलं जे नसीम निकोलस तालेब (Nassim Nicholas Taleb) या लेखकाने लिहिलंय, Fooled by Randomness नावाने. हा ग्रंथ पूर्णपणे या रँडमनेस थिअरीवर आधारित आहे.
आपला मेंदू नमुन्यांशी (patterns) बांधील असतो. अनेक छोट्या-मोठ्या माहितीच्या (information) संकलनावरून मेंदू विचार बनवत (process) असतो, त्यातूनच ज्ञान (coherent knowledge) निर्माण होत असते.
परंतु, अनिश्चितपणा (randomness) हा आपल्या जीवनात सर्वच गोष्टींमध्ये दिसून येतो. समजा एका वहीवरती पेन्सिलीने आपण दोन प्रकारे पानांवर ठिपके काढायला सांगितले. एकसमान ठिपके आणि दुसरीकडे अव्यवस्थित ठिपके काढले आणि लोकांना प्रश्न विचारला की यातील पावसाचे ठिपके कोणते वाटतात? तेव्हा आपला मेंदू नमुन्यांशी (patterns) बांधील असल्याने बहुदा आपण व्यवस्थित काढलेले ठिपकेच पावसाचे सूचक आहेत असे उल्लेख करू. कारण आपला मेंदू पॅटर्नसोबत माहितीचे ग्रहण करत असतो. परंतु खरा खेळ त्या विस्कळीत, अव्यवस्थित ठिपक्यांच्या वरती असतो. जे आपण दुर्लक्षित करतो आणि आपण या नमुन्यांच्या नादात अनिश्चित गोष्टींकडे लक्ष द्यायचं सोडून देतो. खरी शिकवण, खरं ज्ञान, खरा विचार त्या अव्यवस्थित (randomness) माहितीमध्येच दडलेला असतो. खरं तर पावसाचे ठिपके हे काही सुव्यवस्थित रचनेने पडत नसतात कारण ते नैसर्गिक आहेत; काही ठिपके मोठे, काही लहान, काही जवळ, काही लांब असे असतात. तरीदेखील आपला मेंदू पॅटर्न्स शोधण्याच्या नादात त्या वहीवरील व्यवस्थित काढलेल्या ठिपक्यांनाच पावसाशी संबंध जोडेल. साफ चुकीचं आहे.
बहुदा लोक बेडवरती पडून राहून जास्त वेदनेने मरतात, आतंकवादी हल्ल्यांमध्ये पटकन मरण्यापेक्षा. लोक दारूने तीन पट जास्त वाईट मरतात, कोणत्याही भूकंपात झपाट्याने मरण्यापेक्षा. लॉटरीचे तिकीट आणायला जायच्या नादात लोक ॲक्सिडेंटमध्ये मरतात, लॉटरीचे तिकीट जिंकण्यापेक्षा...
म्हणजे ही जी अनिश्चितता असते ती प्रचंड गूढ असते आणि ती ओळखणे खूप कठीण असते. आपण शालेय जीवनापासून शिकत आलेले पॅटर्न्स बाजूला करून एखाद्या गोष्टीच्या अनेक बाजू असू शकतात तिकडे लक्ष द्यायला हवे. लोक म्हणतात IAS, CA होणं अवघड आहे. परंतु सोपं कसं आहे या गोष्टींचा फॉलोअप घेतला पाहिजे. इलॉन मस्क याने Tesla मध्ये एक ब्रीदवाक्य ठेवलं आहे त्याच्या सर्व इंजिनियर्सना उद्देशून, ते आहे: "ज्या गोष्टींचं प्रचलित ज्ञान विश्वात आता उपलब्ध आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि आपल्याला ते सिद्ध करायचं आहे." या विश्वासावर Musk आणि त्याचे सोबती कंपनीत प्रत्येक दिवशी 20-22 तास काम करून अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात.
AI माणसाची जागा का घेऊ शकणार नाही
आता मुद्दा निघाला आहे म्हणून तुम्हाला गंमत सांगतो की AI माणसाची जागा घेऊ शकणार नाही याचं कारण मुळातच हे "रँडमनेस" आहे. म्हणजे बघा, इंटरनेटवरील संपूर्ण डेटा नमुने शोधून, विश्लेषण करून AI आपल्याला ज्ञान सादर करतं. या पाठीमागे एक बांधलेली व्यवस्था (built system) असते. आता बांधलेली रचना म्हणजेच इथे सुव्यवस्थित आखलेली पद्धती (process) असते. आणि जिथे सुव्यवस्थित रचलेली व्यवस्था असते तिथे रँडमनेस अशक्य असतो. किंबहुना AI प्रोग्रॅमला जे काम रचून दिलेले असतं त्याचेच परिणाम रिझल्ट म्हणून आपल्याला ते सादर करते. म्हणजे त्याची स्वतःची डेटामधील रँडमनेस शोधण्याची क्षमता अजिबात नसते. AI इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या प्रचलित ज्ञानालाच सिन्थेसाईज करून आपल्यापर्यंत माहिती देईल, त्या माहितीमधील एखादा वेगळा दृष्टिकोन सादर करण्याऐवजी.
या एकमेव कारणामुळे भविष्यात AI कितीही विकसित होऊ दे परंतु ज्योतिषशास्त्राला पर्याय म्हणून उभं राहू शकणार नाही. ज्योतिषशास्त्र पॅटर्न्सआधारे जितकं विकसित होईल तिथपर्यंत AI आपल्याला उपयोजित ठरेल. उदाहरणार्थ, सिंह लोक प्रतिष्ठा, आत्मविश्वास, व्यक्त होणारे असतात. कुंभ लोकांना बौद्धिक, सामाजिक ओढ असते इत्यादी. परंतु जिथे अनिश्चित गोष्टींचे तर्क लावून समजून घ्यायच्या असतात तिथे तंत्रज्ञानाच्या मर्यादा येतात. रचलेलं आणि सुचलेलं यामध्ये खूप फरक असतो. एखादी गोष्ट रचल्यानंतर ती आकर्षक, गोंडस आणि छान वाटू शकते परंतु सुचलेलं हे भिडतं... खोलवर. ज्योतिषशास्त्र ही रचून समजण्यासारखी विद्या नाही. ती सहज यावी लागते आणि ती सहजता अनिश्चिततेतून (randomness) येते. Fooled by Randomness या पुस्तकाचा मूळ अर्क असा की जीवनातील अनेक घटना नशिबाने घडतात, आपल्या प्रयत्नांमुळे नव्हे. लोक अनेकदा नशिबाला कर्तृत्व समजतात आणि त्यामुळे चुकीचे निर्णय घेतात. Taleb हेच या पुस्तकात समजून सांगतात.
म्हणजे randomness (अनिश्चितता) प्रत्येक गोष्टीत आहे; फक्त शब्दांच्या पलीकडलं समजणारे बुद्धिमान लोक या अनिश्चिततेकडे लक्ष देतात, अन्यथा आपण प्रत्येक जण पॅटर्न्स फॉलो करतो...
-प्रा. रोहित नाईक
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.